सकाळी १० वाजता विरार, दुपारी ३ वाजता मालाड आणि संध्याकाळी ७ वाजता जोगेश्वरी येथे सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी कलाकारांच्या बैठका घेऊन कलाकारांच्या समस्या जाणून घेतल्या. तीनही ठिकाणी स्थानिक भजन कलाकारांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
सकाळी १० वाजता डोंबिवली येथे व दुपारी ३ वाजता भांडुप येथे स्थानिक भजन कलाकारांच्या बैठकांना उपस्थिती दर्शवून कलाकारांशी संवाद साधला, कलाकारांच्या शंकांचे निरसन करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
आमदार सुनिल (भाऊ) राऊत, श्री. शिरिष सावंत (मनसे नेते, भांडूप) सामाजिक कार्यकर्ते श्री. सुजय धुरत तसेच भजन सांप्रदायातील ज्येष्ठ कलावंत सन्माननीय श्री. गोपीनाथ बागवे बुवा, सन्माननीय श्री. भगवान लोकरे बुवा, सन्माननीय श्री. श्रीधर मुणगेकर बुवा, सन्माननीय श्री. रामदास कासले बुवा आणि सन्माननीय श्री. प्रकाश पारकर बुवा, सन्माननीय श्री. संतोष मिराशी बुवा, सन्माननीय श्री. संतोष कानडे बुवा, सन्माननीय श्री. प्रमोद हर्याण बुवा यांच्या शुभहस्ते करण्यांत आले. प्रकाशन समारंभाला जाहिरातदार, भजन कलाकार, हितचिंतक आणि भजनप्रेमींची उपस्थिती लक्षणीय होती. प्रकाशन सोहळ्याचे अन्य आकर्षण होते सुप्रसिद्ध बुवा श्री. सुशील गोठणकर आणि सुप्रसिद्ध बुवा श्री. राजेंद्र नाडणकर बुवा यांच्यात रंगलेला डबलबारी सामना. या सामन्यासही प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
येथे सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री आणि मत्स्य व बंदरे विकास मंत्री मा. ना. श्री. नितेशजी राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्री सभागृह कणकवली येथे संपन्न झाला. या मेळाव्यास सिंधुदुर्गातील बहुसंख्य नवोदित त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध नामवंत भजन कलाकार आणि भजन प्रेमींची उपस्थिती लक्षणीय होती. दरम्यान परमपूज्य भालचंद्र बाबा यांचे आशिर्वाद घेऊन महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला.
देश पातळीवर प्रथमच अ. भा. नाट्यसंमेलन, कवी संमेलन च्या धर्तीवर अखिल भारतीय भजन संमेलन २०२५ आयोजित करण्यात आले. ज्येष्ठ संतसाहित्य अभ्यासक, लेखक तथा संत तुकाराम महाराज यांचे वंशज सन्माननीय श्री. सदानंद मोरे माऊली यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा. सांस्कृतिक कार्यमंत्री सन्माननीय अॅड. श्री. आशिषजी शेलार यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या देशातील पहिल्या अखिल भारतीय भजन संमेलनास उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, मध्यप्रदेश येथील नामवंत कलाकारांनी उपस्थिती दर्शविली.
मा. सांस्कृतिक कार्यमंत्री सन्माननीय ॲड. श्री. आशिषजी शेलार यांच्या संकल्पनेतून भजन महोत्सव २०२५ च्या आयोजनाचा सन्मान आपल्या अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक संघटनेला मिळाला. एकतारी भजन, वारकरी भजन, दिंडी भजन, एकल भजन गायन, डबलबारी भजन सामना, महिला एकल भजन इत्यादी अशा नऊ भजन कलाप्रकारांचे आयोजन तीन दिवसात करून संघटनेने हा महोत्सव यशस्वी केला.
संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत पायी वारी करण्याचे नियोजन अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते, या पायी वारीसाठी मुंबई-ठाणे विभागातून १२५ भजन कलाकार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १०० भजन सदस्य कलाकारांनी अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळाच्या या विशेष उपक्रमात सहभाग घेऊन पायी वारीचा आध्यात्मिक अनुभव आणि आनंद घेतला.
रायगड जिल्हा आयोजित भजन मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. अनेक भजन कलाकार व भजन प्रेमी उपस्थित होते.
या मेळाव्यास बहुसंख्य भजन कलाकार आणि भजन प्रेमींनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवून एकप्रकारे आपल्या कार्यास मान्यतेची पावतीच दिली. तसेच अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर शाखा अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ (रजि.) या शिखर संस्थेच्या नावानेच स्थापन केली. दरम्यान या भजन महोत्सवाला आमदार श्री. भास्कर जाधव यांची विशेष उपस्थिती होती.
पनवेल, रामशेठ ठाकूर सभागृहामध्ये पनवेल, कर्जत, खोपोली, उरण, पेण विभागातील भजनी कलावंतांची सभा आयोजित केली होती. उपस्थित मान्यवरांमध्ये भजन सम्राट बुवा श्री. निवृत्ती बुवा चौधरी, श्री. नारायण बुवा पाटील, श्री. दत्ता बुवा ओढंगीकर, श्री. गणेश बुवा बंडा अन्य मान्यवर उपस्थित होते.